आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान - लेख सूची

आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (१)

1996 साली ब्रिटनमधील विश्व हिंदू परिषदेने एक सचित्र व गुळगुळीत पुस्तक प्रकाशित केले. हिंदू धर्माचि स्पष्टीकरण शिक्षकांसाठी मार्गदर्शिका’ या नावाच्या या पुस्तकात ‘वर्गात हिंदू कल्पना व विषय शिकवण्याबाबतच्या सूचना’ आहेत. ब्रिटिश शालापद्धतीतील माध्यमिक व उच्च वर्गामध्ये वापरासाठी हे पुस्तक आहे. आज पुस्तक दुसऱ्या आवृत्तीत उपलब्ध आहे.  पुस्तक ब्रिटिश शिक्षकांना सांगते की हिंदू धर्म हे चिरंतन …

आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (२)

एकोणिसाव्या शतकातील नव-हिंदुराष्ट्रवाद्यांनी अध्यात्मकेंद्री हिंदुत्वाच्या आधिभौतिक रूपावर आधुनिक विज्ञानाचा साज चढवायला सुरुवात केली. कर्मकांडे, निसर्गव्यवहार आणि मानवाची नियती यांच्यात साम्ये शोधण्याच्या प्राचीन पंडिती परंपरेचाच तो एक नवा अविष्कार होता. आजचे हिंदुत्वप्रचारक या लोकांचेच वारस आहेत. आधुनिकोत्तरांचे मत असे विश्वाचे वास्तव रूप अनाकलनीय आहे. सर्वच समाज आपापल्या रचनेप्रमाणे विश्वाबाबतच्या ज्ञानाची पद्धतशीर ‘दर्शने’ उभारतात. सर्वच समाजांची दर्शने …

आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (३)

पाश्चात्त्य देशांनी इतरांचे शोषण करण्यासाठी विज्ञानाचा गैरवापर केला. ‘नेटिव्हां’ना कमी लेखणे विज्ञानाच्या मदतीने घडले. परकी परंपरांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी प्रबोधन-काळातल्यासारखा विज्ञानाचा वापर केला. हे सर्व नाकारता येत नाही. पण हे नोंदण्यामुळे, यावर टीका करण्यामुळे आधुनिकोत्तर विचारवंत धर्माधिष्ठित ‘उजव्या’ विचारवंतांचे सहकारी, दोस्त होत नाहीत. पण आधुनिकोत्तर विचारवंत विज्ञानाच्या राजकीय गैरवापरावरील टीका करून थांबत नाहीत. ते वस्तुनिष्ठ …